Songadh News: ध्वजारोहणाने सोनगडमध्ये पंचकल्याण महोत्सवास प्रारंभ; सोनगढ नगरी सजली

Songadh News: सोनगड येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास आज(शुक्रवार) पासून उत्साहात प्रारंभ झाला.
Songadh News
Songadh NewsEsakal
Updated on

सोनगड (गुजरात) ता. 19: येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट, यांच्या वतीने आयोजित श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास आज(शुक्रवार) पासून उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन पूजा महोत्सवास सुरवात झाली.

एकोणीस एकराध्ये उभारण्यात आलेल्या प्रांगणामध्ये हा महोत्सव सलग सात दिवस चालेल.अयोध्या पुरी या नावाने उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपात धार्मिक विधी सुरू झाले आहेत. सकाळच्या सत्रात

मंगल धर्म ध्वजारोहण, प्रतिष्ठा मंडपाचे उदघाटन, नंदी विधान कलश, जिनवाणी प्रतिष्ठापना आदी कार्यक्रम झाले. दुपारच्या सत्रात पंचपरमेषठी विधान, इंद्रप्रतिष्ठा, गोत्र परिवर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. या साठी हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. महोत्सवामध्ये भगवान बाहुबली यांच्या 41 फुटी मूर्तिबरोबरच 140 छोट्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. पूजेच्या निमित्ताने सोनगढ नगरी सजली आहे.

सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण होऊन या पंच कल्याण महोत्सवास प्रारंभ होईल. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मान्यवर तज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.

Songadh News
Air India: ज्या प्रवाशाला मिळाली खराब सीट, ते निघाले निवृत्त न्यायमूर्ती.. आता एअर इंडियाला द्यावी लागणार 23 लाखांची भरपाई!

जैन धर्मातील संत कानजीस्वामी यांच्या सानिध्यामुळे गुजरात मधील सौराष्ट्राच्या भावनगर जिल्ह्यातील सोनगढ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी राहून कानजीस्वामींनी जैन धर्मातील विचार स्वाध्यायाच्या माध्यमातून पोहचवले. सोनगड मध्ये त्यांचे हजारो अनुयायी आजही जैन धर्माच्या प्रसारात अग्रेसर आहेत. या ठिकाणी अनेक पुरातन जैन मंदिरे आहेत. ही मंदिरेही या पूजेच्या निमित्ताने उजळून निघाली आहेत. पूजेत सुमारे वीस हजार भाविक हजेरी लावतील अशी शक्यता आहे.

सर्व धार्मिक विधी, कार्यक्रम थ्री डी ऍनिमेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. सुमारे एक लाख स्क्वेअर फुटाचा वातानुकूलित भव्य मंडप उभारण्यात आला असून या मंडपाची क्षमता 12 हजार लोकांची आहे.

Songadh News
Vadodara Boat Capsize Incident: 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.