जयपूर- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. संसदेचे विशेष अधिवेशन वेगळ्याच कारणासाठी बोलावण्यात आले होते. पण, जनतेकडून दबाव वाढल्यानंतर भाजपला महिला आरक्षण विधेयक सादर करावं लागलं, असं ते म्हणाले. राहुल गांधी राजस्थानमधील जयपूरच्या सभेमध्ये बोलत होते. (MP Rahul Gandhi criticize bjp over Women Reservation)
अगोदर ते महिला आरक्षाबाबत काही बोलत नव्हते. भारत विरुद्ध इंडिया यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पण, लोकांना ही गोष्टी आवडली नसल्याचं त्यांना जाणवलं. संसदेचे विशेष अधिवेशन तर बोलावलं आहे, त्यामुळे आता काय करावं असा संभ्रम त्यांच्यात निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी नाईलाजाने महिला आरक्षण विधेयक आणलं,असा दावा राहुल गांधी यांनी केलाय.
आम्ही महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिलाय. भाजप म्हणतंय की नवी जनगणना आणि मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू करण्यात येईल. पण, खरं म्हणजे महिलांना ३३ टक्के आरक्षण आता लगेच लागू केले जाऊ शकते. यात काही अडचण नाही. पण, भाजपला महिला आरक्षण १० वर्षे पुढे ढकलायचं आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची त्यांची मानसीकता नाही. त्यामुळे महिलांना तात्काळ आरक्षण शक्य असताना देण्यात आलेले नाही. हे विधेयक तात्काळ लागू व्हावे अशी आमची इच्छा आहे. तसेच इतर मागास वर्गीयांना याचा लाभ व्हावा अशी आमची भूमिका आहे.'
दरम्यान, भाजप सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. असे असले तरी कायदा लागू होण्यास अधिक वेळ लागणार आहे. मतदारसंघाची फेररचना करण्याची प्रक्रिया २०२६ नंतर सुरु होणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.