लशींच्या खरेदीबाबत वाटाघाटी; जयशंकर यांचा अमेरिका दौरा

s jayshankar
s jayshankar
Updated on
Summary

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात २४ ते २८ मे असे पाच दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात २४ ते २८ मे असे पाच दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांसह अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही ते भेटतील. या दौऱ्यात कोरोनाप्रतिबंधक लशींच्या खरेदीबाबत प्रामुख्याने वाटाघाटी अपेक्षित आहेत. देशांतर्गत लसटंचाईमुळे ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण विस्कळित झाल्याने केंद्र सरकारने लस उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांसोबतच लस आयातीवरही लक्ष केंद्रित केले आहे. रशियातून लस आयात सुरू झाली आहेच, शिवाय अमेरिकेतूनही लस खरेदी आणि उत्पादनाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. (Jaishankar to visit US next week for corona help india)

ऑक्सिजन प्रकल्प, कॉन्सन्ट्रेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन या वैद्यकीय मदतीसह कोविशिल्ड लस उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा यात अमेरिकेची भूमिका लक्षात घेता या देशातील लस उत्पादकांशी चर्चेलाही भारत सरकारने प्राधान्य दिले आहे. सद्यःस्थितीत अॅस्ट्राजेनेका, फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अॅंड जॉन्सन या उत्पादकांच्या कोरोनाप्रतिबंधक लशींचा साठा अमेरिकेकडे आहे. तर, बायडेन प्रशासनानेही कोरोनाच्या लाटेचा सामना करणाऱ्या देशांसाठी आठ कोटी लसींच्या वितरणाची घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याला महत्त्व आले आहे.

s jayshankar
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणारच

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २४ मेस (सोमवारी) अमेरिकेत पोहोचतील. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टोनियो ग्युटेरेस यांच्याशी त्यांची भेट अपेक्षित आहे. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्टोनी ब्लिंकेन तसेच ज्यो बायडेन यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनाही जयशंकर भेटतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर बोलतील. यादरम्यान भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक तसेच कोविड सहकार्याबाबत उद्योजक संघटनांशीही ते बातचीत करतील, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.