चेन्नई : तामिळनाडूमधील जलिकट्टू या बैलांच्या शर्यतींचा पारंपारिक खेळाचा थरार अनुभवनं अनेकांचा आवडता छंद आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींसारखी पण बरीच भिन्न असलेली ही स्पर्धा आहे. बलवान अशा बैलांसोबत ही स्पर्धा असल्यानं अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात.
यांमध्ये मुक्या प्राण्यांना इजा होत असल्याचं अनेकदा प्राणीमित्र संघटनांनी याविरोधात आवाज उठवला आहे. यंदाच्या या स्पर्धेतही ६० जण जखमी झाल्याचं समोर आलं असून यांपैकी एकाच मृत्यू झाला आहे. (Jallikattu 2023 Bull tamer Arvindraj was critically injured is died while participating in Jallikattu at Palamedu)
मदुराईच्या पलामेदू इथं आयोजित करण्यात आलेल्या जलिकट्टू स्पर्धेत बैलाचा नियंत्रक अरविंदराज नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. इथल्या खेळादरम्यान, ६० जण जखमी झाले असून यांपैकी २० जणांची प्रकृती गंभीर आहे. तर अरविंदराज याचा मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं.
मदुराईमधील तीन गावांमध्ये या स्पर्धे मोठ्या उत्साहात भरवल्या गेल्या आहेत. हा खेळ सुरळीत सुरु राहिल याची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया रविवारी मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. पण त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी यामध्ये ६० जण जखमी झाले आणि एकाचा मृत्यू झाला, त्यामुळं पु्न्हा एकदा या स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
दरम्यान, १ डिसेंबर २०२२ रोजी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी तामिळनाडूच्या जलिकट्टू खेळाबाबतच्या कायद्यावर कोर्टानं मोठी टिप्पणी केली होती. पाच सदस्यीय घटनापीठानं म्हटलं होतं की, बैलांना नियंत्रण मिळवण्याच्या या खेळात पशूसोबत क्रूरता होत असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळं याला परवानगी दिली जावी का? हा मुख्य प्रश्न आहे. पशूसोबत क्रूरता केली जाणाऱ्या या खेळाला परवानगी दिली जाऊ शकत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.