Jalpaiguri Storm: पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा मोठा फटका! ५ ठार तर शेकडो जखमी, ममता बॅनर्जी उत्तर बंगालमध्ये रवाना

Jalpaiguri Storm: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करून रविवारी रात्री जलपाईगुडीला पोहोचल्या. वादळात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.
Jalpaiguri Storm
Jalpaiguri StormEsakal
Updated on

Jalpaiguri Storm: वादळामुळे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, रविवारी राज्याच्या जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागात आलेल्या वादळामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. या वादळात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल घटनास्थळाचा आढावा घेतला. त्याचबरोबर जखमींची देखील भेट घेतली आहे. या परिस्थितीत प्रशासन सर्व प्रकरची मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे.

Jalpaiguri Storm
Katchatheevu Island Row: CAA विरुद्ध कच्चाथिऊ बेट? भाजपनं का उपस्थित केला हा नवा मुद्दा

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरे पडली, झाले उन्मळून गेली, विजेचे खांब पडले. या वादळामुळे आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नियोजित दौरा रद्द करून रविवारी रात्री जलपाईगुडीची पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला.

Jalpaiguri Storm
AAP MLAs Allegations Against BJP: भाजपमध्ये सामील होण्यासाठी मिळाली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर; AAP आमदाराने दाखल केला FIR

रविवारी पश्चिम बंगालमध्ये धडकलेल्या चक्रीवादमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामध्ये द्विजेंद्र नारायण सरकार (52), अनिमा रॉय (49), जोगेन रॉय (70) आणि समर रॉय (64) यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या आपत्तीमुळे अनेक घरांचे नुकसान झालं आहे, पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पीडितांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. प्रशासन गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहील, असं आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

Jalpaiguri Storm
Video: आसाममध्ये तुफान पाऊस; एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानांचे मार्ग वळवले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.