मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड हाफिज सईदला 31 वर्ष तुरुंगवास

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून ज्या दहशतवाद्याचे नाव समोर आले होते त्यामध्ये जमात उद हावाचा प्रमुख हाफिज (Global News) सईदचे नाव घ्यावे लागेल.
 hafiz saeed
hafiz saeed esakal
Updated on

Pakistan News: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून ज्या दहशतवाद्याचे नाव समोर आले होते त्यामध्ये जमात उद हावाचा प्रमुख हाफिज (Global News) सईदचे नाव घ्यावे लागेल. त्याला आता पाकिस्तानी कोर्टानं मोठी शिक्षा सुनावली आहे. त्याला आता 31 वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हाफिज सय्यद हा काही काळ लष्कर ए तोयब्बाचा प्रमुखपदीही राहिला आहे. अशा कुख्यात व्यक्तीच्या शोधात जगातील अनेक देश होते. तो पाकिस्तानात लपून बसल्याच्या कित्येक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मुंबई बॉम्बस्फोटामध्ये त्यानं घातपात घडवून आणल्याचे सांगण्यात आले होते.

सध्या पाकिस्तानमधील राजकीय बदल हे मोठ्या प्रमाणं होत आहेत. काही दिवसांपासून विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर वेगवेगळे आरोप करुन त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला होता. दुसरीकडे पाकिस्तान कोर्टानं (Anti Terrorism Court) दिलेला हा निर्णय यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. सुत्रांकडून मिळालेंल्या माहितीनुसार, ज्या मशिदी आणि मदरसा हाफिज सईदनं बांधल्या आहेत त्या आता पाकिस्तानी सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. पाकिस्तानातील दहशतावाद विरोधी कोर्टानं यासंबंधी एक महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामध्ये हाफिद सईज आणि त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांवर दहशतवाद आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची अफरातफर असा आरोप करण्यात आला होता. यापूर्वी देखील हाफिजवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले होते. 2020 मध्ये हाफिजला 15 वर्षांची शिक्षा पैशांची अफरातफर केल्याप्रकरणात सुनावण्यात आल्याचे दिसून आले आहे. 70 वर्षांच्या हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून ओळखलं जातं.

 hafiz saeed
Pakistan| इम्रान खान यांच्या प्रयत्नांना अपयश, द्यावा लागणार राजीनामा ?

पाकिस्तामध्येही अजुनही 26/11 च्या प्रकरणावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसते. त्या घटनेला 14 वर्षे होऊन गेली. दुसरीकडे मुंबई हल्ला प्रकरणाची ट्रायल पूर्ण पाकिस्तानात पूर्ण झालेली नाही. यापूर्वी भारतानं अनेकदा पाकिस्तानला मुंबई हल्ल्यातील प्रकरणाची तातडीनं सुनावणी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

 hafiz saeed
Sharad Pawar | शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व ? बैठकीत ठराव मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.