2019 मध्ये दिल्लीतील जामियामध्ये हिंसाचार झाला होता. या आरोपात शरजील इमामसह 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिल्ली : दिल्लीतील 2019 च्या जामिया हिंसाचार प्रकरणात (Jamia violence case) शरजील इमामसह (Sharjeel Imam) 9 आरोपींना उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) मोठा धक्का बसलाय.
कनिष्ठ न्यायालयानं एकूण 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता उच्च न्यायालयानं 9 आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिलेत. आरोपींना दोषमुक्त करण्याच्या आदेशाला दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आता दिल्ली उच्च न्यायालयानं शरजील इमाम, सफूरा जरगर, आशिफ इक्बाल तन्हा यांच्यासह 9 आरोपींना दणका दिलाय. मात्र, 2 आरोपींना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
2019 मध्ये दिल्लीतील जामियामध्ये हिंसाचार झाला होता. या आरोपात शरजील इमामसह 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात साकेत न्यायालयानं सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आदेशाला आव्हान दिलं. आता या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं 9 आरोपींवर विविध कलमांतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्या कोर्टानं हा आदेश दिला आहे. न्यायालयानं आयपीसीच्या कलम 143, 147, 149, 186, 353, 427 अंतर्गत शरजील इमाम, आसिफ इक्बाल तन्हा आणि सफूरा जरगर यांच्यासह 9 जणांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत, तर मोहम्मद अबुजर आणि मोहम्मद शोएब या दोन जणांवर न्यायालयानं आरोपींची निर्दोष मुक्तता केलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.