LGBT Marriage : समलिंगी विवाहावर मुस्लिम संघटनेचं मोठं वक्तव्य; 'या' हिंदू परंपरेचा दिला हवाला

जमियत उलेमा-ए-हिंदनं हा कुटुंब व्यवस्थेवर हल्ला असल्याचं म्हटलंय.
Jamiat Ulema-e-Hind big statement on LGBT Marriage
Jamiat Ulema-e-Hind big statement on LGBT Marriageesakal
Updated on
Summary

सुप्रीम कोर्टात प्रलंबित याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करताना जमियत उलेमा-ए-हिंदनं हिंदू परंपरांचा हवाला दिला आहे.

Jamiat Ulema-e-Hind Statement : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद ही मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरलीये.

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध करत जमियत उलेमा-ए-हिंदनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदनं हा कुटुंब व्यवस्थेवर हल्ला असल्याचं म्हटलंय. 'हे सर्व वैयक्तिक कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे.' सुप्रीम कोर्टात प्रलंबित याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करताना जमियत उलेमा-ए-हिंदनं हिंदू परंपरांचा हवाला दिला आहे.

Jamiat Ulema-e-Hind big statement on LGBT Marriage
VIDEO : भररस्त्यात आयोगाच्या पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडा-झडती; बोम्मईंच्या कारमध्ये काय सापडलं?

संस्थेनं म्हटलंय की, हिंदू धर्मातही विवाहाचा उद्देश केवळ भौतिक सुख आणि संतती नसून आध्यात्मिक प्रगती आहे. हा हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी एक आहे. समलिंगी विवाह हा एक प्रकारे कुटुंब व्यवस्थेवरचा हल्ला आहे. 13 मार्च रोजी सुप्रीम कोर्टानं समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिका 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं पाठवल्या होत्या.

Jamiat Ulema-e-Hind big statement on LGBT Marriage
Giorgia Meloni : 'या' देशात इंग्रजीसह परदेशी भाषांवर येणार बंदी; English बोलल्यास भरावा लागणार मोठा दंड!

दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं की, 'हा मुद्दा घटनात्मक अधिकारांशी संबंधित आहे.' त्याचवेळी जमियत उलेमा-ए-हिंदनं म्हटलं की, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांद्वारे समलिंगी विवाहाची कल्पना मांडण्यात आली. त्यामुळं विवाहाची मूळ संकल्पना कमकुवत होऊ शकते. विशेष म्हणजे, केंद्र सरकारनंही सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना विरोध केलाय.

Jamiat Ulema-e-Hind big statement on LGBT Marriage
Ram Navami Violence : रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक-गोळीबार; कलम 144 लागू, इंटरनेट सेवा बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.