Narendra Modi : कलम ३७० मुळे काश्‍मीरचा विकास खुंटला

‘काश्‍मीरच्या विकासातील मोठा अडसर कलम ३७० चा होता. त्यामुळे विकास खुंटला होता. भाजप सरकारने त्याला बाजूला करत नवा अध्याय लिहला.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

जम्मू - ‘काश्‍मीरच्या विकासातील मोठा अडसर कलम ३७० चा होता. त्यामुळे विकास खुंटला होता. भाजप सरकारने त्याला बाजूला करत नवा अध्याय लिहला. आता ‘कलम ३७०’ चित्रपट येत आहे. लोकांना खऱ्या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि ही चांगली बाब आहे.

आगामी निवडणुकीत भाजपला ३७० जागा द्या’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तरुणांनी घराणेशाही, भ्रष्टाचार, लांगुलचालनविरुद्ध बिगूल फुंकले आहे, असेही ते म्हणाले. कधीकाळी काश्‍मीरमध्ये शाळा पेटविल्या जात होत्या, आता त्या सजविल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्‍मीरमधील ३२ हजार कोटी प्रकल्पांचे उद््घाटन केले. याशिवाय जम्मू येथूनच देशभरातील १३५०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे अनावरण आणि भूमिपूजन केले. जम्मू येथील मौलाना आझाद स्टेडियममध्ये आयोजित सभेत बोलताना पंतप्रधानांनी भाषणाची सुरवात काश्‍मीर भाषेत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्राने जम्मू-काश्‍मीरच्या विकासाचा संकल्प केला आहे. सुमारे पन्नास नवीन महाविद्यालय येथे स्थापन करण्यात येत आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या जनतेचे स्वप्न ७० वर्षापासून साकार झालेले नव्हते. परंतु आता येत्या काही वर्षांत ते पूर्ण होतील.’

आपल्या देशात आर्थिक शक्ती अधिक असेल तर जनतेच्या कल्याणासाठी अधिक खर्च केला जाईल. भारतात आज आपल्या नागरिकांना मोफत धान्य, मोफत आरोग्य सेवा, पक्के घर आणि अन्य गरजेच्या वस्तू प्रदान केल्या जात आहेत. भारत जागतिक पातळीवर आर्थिक महाशक्ती होत असल्यानेच या गोष्टी साध्य होत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘जम्मू काश्‍मीरच्या विकासात कलम ३७० हा मोठा अडथळा होता. परंतु ही भिंत भाजपने हटविली आहे. आता जम्मू काश्‍मीर विकासाकडे वाटचाल करत आहे. येथे आरोग्य, शिक्षण, रेल्वे, पेट्रोलियम, पायाभूत सुविधा यांसह विविध विकास कामे केली जात आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जम्मू काश्‍मीरमध्ये निवडलेल्या दीड हजार सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तपत्रे दिली. तसेच विकसित भारत-विकसित जम्मू कार्यक्रमांतर्गंत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

उद्‌घाटनाचा धडाका

  • रामबन-बारामुल्ला रेल्वे मार्ग

  • रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर सर्वांत उंच पूल

  • जम्मू विमानतळावर नवीन टर्मिनलच्या इमारतीचे अनावरण

  • बारामुल्ला, श्रीनगर, बनिहाल, सांगल्डान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण

  • दिल्ली, अमृतसर, कटरा ‘एक्स्प्रेस’वे

  • जम्मू येथे एम्स रुग्णालय. शिक्षण, वीज प्रकल्प आदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.