जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरात जोरदार चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu and Kashmir Encounter in Awantipora Two Terrorists Killed
Jammu and Kashmir Encounter in Awantipora Two Terrorists Killedesakal
Updated on
Summary

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा इथं आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अवंतीपोरा (Awantipora) इथं आज (मंगळवार) सुरक्षा दल (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा केलाय. त्यांच्याकडून 2 एके-47 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलंय. त्रालचा रहिवासी शाहिद राथर आणि शोपियानचा रहिवासी उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) या प्रकरणाची माहिती दिलीय.

याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, पुलवामामधील (Pulwama Attack) अवंतीपोरातील राजपोरा भागात चकमक सुरूय. पोलीस आणि सुरक्षा दल आपलं काम करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलाचं संयुक्त पथक शोध मोहीम राबवत असताना चकमक सुरू झाली. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याचवेळी दहशतवादी लपून बसले होते, तेथून गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनाही गोळीबार करावा लागला.

Jammu and Kashmir Encounter in Awantipora Two Terrorists Killed
Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

एक दिवसापूर्वी, 'पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) दोन दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, या महिन्याच्या सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील असलेला एक दहशतवादीही चकमकीत मारला गेलाय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.