जम्मू-काश्मीर हे लोकशाहीचे उदाहरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदी; विशेष दर्जा असूनही वंचित जनतेला मिळाले हक्क
Jammu and Kashmir example democracy Despite special status deprived people got rights Prime Minister Narendra Modi
Jammu and Kashmir example democracy Despite special status deprived people got rights Prime Minister Narendra ModiSAKAL
Updated on

पल्ली : गेल्या दोन-तीन वर्षांत विविध विकास प्रकल्प हाती घेण्यात आल्यामुळे जम्मू-काश्मीर हे लोकशाही आणि निश्चयाचे नवे उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सांबा जिल्ह्यातील पल्ली खेड्यात राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मोदी यांनी सौर प्रकल्प देशाला अर्पण केला. त्यामुळे पल्ली ही कार्बन-न्युट्रल असलेली देशातील पहिली पंचायत ठरली. देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

ऑगस्ट २०१९ मध्ये ३७०वे कलम रद्द करण्यात आल्यापासून मोदी यांनी प्रथमच येथे भेट दिली. ते पुढे म्हणाले की, माझ्या सरकारने तब्बल १७५ केंद्रीय कायदे आणि पंचायती राज पद्धतीची अंमलबजावणी केली. ३७०व्या कलमानुसार विशेष दर्जा असूनही जम्मू-काश्मीरची जनता यापासून वंचित होती. आता त्यांना आपले न्याय्य हक्क मिळाले आहेत. अलीकडेच त्रिस्तरीय पंचायती राज पद्धतीसाठी प्रथमच निवडणूका शांततेत पार पडल्या. आमच्या सरकारने येथील पंचायतींना २२ हजार कोटी रुपयांचा निधी थेट दिला आहे. हीच रक्कम यापूर्वी पाच हजार कोटींची होती. गेल्या सात दशकांत येथील खासगी गुंतवणूक १७ हजार कोटी रुपये होती, जी गेल्या दोन वर्षांत ३८ हजार कोटींच्या घरात गेली आहे.

विविध प्रकल्पांची पायाभरणी

  • पंतप्रधानांच्या हस्ते २० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी

  • बनीहाल-काझीगुंड मार्गावरील बोगद्याचे उद््घाटन, बोगद्याचे अंतर आठ किलोमीटर ४५ मीटर, यामुळे दोन विभागांत कोणत्याही हवामानात वाहतुकीची सुविधा, या दोन ठिकाणांमधील अंतर १६ किमीने, तर प्रवासाचा कालावधी दीड तासांनी कमी

  • दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्गावरील तीन टप्प्यांतील रस्त्यांच्या कामांचा कोनशिला समारंभ

  • देशातील प्रत्येक जिल्ह्यातील ७५ जलसाठ्यांचा विकास आणि पुनरुज्जीवनासाठी सुरु करण्यात आलेल्या अमृत सरोवर

  • उपक्रमाचा प्रारंभ

  • किश्तवाड येथील चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या रतले व क्वार येथील जलविद्युत प्रकल्पांचा कोनशिला समारंभ

  • जम्मू-काश्मीरमध्ये जेनेरीक औषधांसाठी १०० विक्री केंद्रांचे उद््घाटन, बहुतांश केंद्रे दुर्गम भागांत

  • स्वामित्व कार्डचे वाटप, खेड्यांचे सर्वेक्षण आणि गावातील परिसरांचे अद्ययावत तंत्रज्ञानाने मॅपिंग करण्याची ही योजना

  • ३१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ३२२ पंचायतींना ४४ कोटी ७० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेचे डिजिटल पद्धतीने वाटप

पल्लीचा वर्धापनदिन २४ एप्रिलला

पल्ली येथे सुमारे तीन आठवड्यांच्या विक्रमी कालावधी ५०० किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला. जम्मूपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाने आपला वर्धापनदिन साजरा करावा अशी सूचना मोदी यांनी आपल्या भाषणात केली. त्यावर पल्लीचे सरपंच रविंदर शर्मा यांनी आजचा दिवस हाच वर्धापनदिन असेल असे जाहीर केले.

पुढील २५ वर्षे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ आहे. या कालावधीत जम्मू-काश्मीर यशाचा नवा अध्याय साकारेल. वेगवान विकासामुळे येथील युवकांना रोजगार मिळेल.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.