नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्यातून लडाख वेगळा करत हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित करण्यात आले होते. यानंतर आता जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला नायब राज्यपालांची मंजुरी दिली आहे. उमर अब्दुल्ला यांच्या कॅबिनेटनं दोन दिवसांपूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळं आता नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्यानं केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतंय हे पाहावं लागणार आहे.