Haryanna, J&K Vidhan Sabha Election: हरयाणा, जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर; कलम ३७० हटवल्यानंतर होणार पहिलीच निवडणूक

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ही पहिलीच निवडणूक होणार आहे.
Rajeev Kumar
Rajeev Kumar
Updated on

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरयाणात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

तर दोन्ही निवडणुकांचे निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.