Jammu And Kashmir: लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी घेरलं; चकमक सुरु

Indian troops surrounded Terrorist: दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर बासित अहमद डार याला भारतीय लष्कराने घेरले असल्याची माहिती मिळत आहे.
top commander
Terrorist

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला होता. यात एक जवान शहीद झाला होता. याप्रकरणी लष्कराने ऑपरेशन सुरु केले असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सोमवारी सकाळी दक्षिण काश्मीरच्या कुलगामच्या रेडवानी पाईन भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. मंगळवारपर्यंत ही चकमक सुरु आहे.

दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर बासित अहमद डार याला भारतीय लष्कराने घेरले असल्याची माहिती मिळत आहे. मागील वर्षी राष्ट्रीय तपास एजेन्सी एनआयएने द रेसिस्टंस फ्रंटचा कमांडर बासित अहमद डारवर १० लाखांचे बक्षीस ठेवले होते. लष्कर त्याच्या शोधात होते. त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती. अखेर तो लष्कराच्या कचाट्यात सापडला आहे.

top commander
Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बासितने अनेक हत्याकांड घडवून आणले आहेत. रेडवानीच्या कुलगामचा रहिवाशी असलेला बासित एप्रिल २०२२ पासून आपल्या घरातून बेपत्ता होता. तो लष्कर-ए-तय्यबाच्या द रेसिस्टंट फ्रंड (टीआरएफ) मध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून तो लष्कराच्या रडारवर होता.

चार मे रोजी झाला होता हल्ला

जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यामध्ये ४ मे रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. भारतीय वायु सेनेच्या ताफ्यावर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये आयएएफचा १ जवान शहीद झाला होता, तर चार जवान जखमी झाले होते. वायुसेनेचा ताफा सुरनकोट भागातून सनाई टॉपकडे जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांकडून पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे.

top commander
पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

पुंछ जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेला हा वर्षातील दुसरा हल्ला आहे. जानेवारी महिन्यामध्ये काही अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीवर गोळीबार केला होता. ४ मे रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये याच गटाचा हात असल्याचा संशय आहे. मागील वर्षी २१ डिसेंबर रोजी बुफलियाज भागामध्ये लष्कराच्या गाडीवर हल्ला झाला होता. यात चार जवान शहीद झाले होते, तर तिघेजण जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com