वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी

Vaishno Devi Stampede News
Vaishno Devi Stampede Newsesakal
Updated on
Summary

माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झालाय, 500 जणांवर उपचार सुरू आहेत.

Vaishno Devi Stampede News : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) माता वैष्णोदेवी मंदिरात (Mata Vaishno Devi Temple) शनिवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले आहेत. नववर्षाच्या निमित्तानं माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक याठिकाणी दाखल झाले होते. दरम्यान, गेट क्रमांक तीनजवळील गाभाऱ्याबाहेर चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या दुर्घटनेनंतर जखमींना माता वैष्णोदेवी नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

या दुर्घटनेनंतर बोलताना जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह (DGP Dilbag Singh) म्हणाले, काही तरुणांमधील किरकोळ भांडणामुळं वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. यात दुर्दैवानं 12 जणांना आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणलीय.

Vaishno Devi Stampede News
पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

माता वैष्णोदेवी नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे (Mata Vaishno Devi Narayana Superspeciality Hospital) डॉ. जेपी सिंह यांनी सांगितलं, की या घटनेतील 15 जखमींना रुग्णालयात आणण्यात आलंय, यापैकी 4 जण आयसीयूत दाखल आहेत. तर 11 जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी 3-4 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. सध्या 500 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं कळतंय. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, या घटनेवर बारकाईनं आमचं लक्ष आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

Vaishno Devi Stampede News
Vaishno Devi Stampede News
Vaishno Devi Stampede News
वैष्णो देवीच नव्हे, तर भारतासाठी 1 जानेवारीचा इतिहास भयंकर आहे!

माता वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीशी संबंधित 10 मोठ्या गोष्टी

1. 2021 वर्ष संपताच शनिवारी रात्री उशिरा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये किरकोळ वाद झाला. परंतु, काही वेळानंतर या वादानं मोठं रौद्ररुप धारण केलं आणि परिस्थिती बिघडून मंदिरात चेंगराचेंगरी झाली.

2. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर, जखमींना माता वैष्णोदेवी नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

3. अपघाताची भीषणता लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीत गृह मंत्रालयाचे प्रधान सचिव, जम्मूचे एडीजीपी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश असणार आहे.

4. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की शनिवारी पहाटे 2.45 वाजता अचानक चेंगराचेंगरी झाली. त्रिकुटा पर्वतावर असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील गेट क्रमांक तीनजवळ ही घटना घडली. नवीन वर्षाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक आईच्या दर्शनासाठी याठिकाणी आले होते. यावेळी मोठी चेंगराचेंगरी झाली.

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घटनेवर ट्विट करून शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, या दुर्दैवी घटनेनं मला खूप दु:ख झालंय. मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात-लवकर बरे व्हावेत, अशी त्यांनी प्रार्थना केलीय. मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, उधमपूरचे खासदार डॉ. जितेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी बोललो असून या घटनेवर लक्ष ठेवण्यास सांगितल्याचे मोदी म्हणाले.

Vaishno Devi Stampede News
तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 3 ठार, 5 जखमी

6. या चेंगराचेंगरीनंतर लेफ्टनंट गव्हर्नर आणि श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या (Mata Vaishnodevi Shrine Board) कार्यालयानं पीडित कुटुंबांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केलाय. एलजी कार्यालयानं श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डचे दोन हेल्पलाइन क्रमांक (01991-234804 व 01991-234053) शेअर केले आहेत.

7. या अपघातातील मृतांना 12 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आलीय. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या कार्यालयानं ट्विट केलंय, की, चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला PMNRF कडून 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपये दिले जाणार आहेत.

8. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले, काही तरुणांमधील किरकोळ भांडणामुळं वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. यात दुर्दैवानं 12 जणांना आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणलीय.

9. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलंय.

10. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर लगेचच प्रवासावर बंदी घालण्यात आलीय. मात्र, नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर प्रशासनानं वैष्णोदेवी मंदिराकडीस प्रवास सुरू केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()