'पुन्हा अशी चूक करु नका'; 3 नागरिकांच्या मृत्यूनंतर राजनाथ सिहांनी लष्कराला सुनावलं

जम्मू-काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात तीन नागरिकांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.
Rajnath Singh
Rajnath Singh
Updated on

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात तीन नागरिकांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. तसेच एक प्रकारे लष्करी अधिकाऱ्यांना सुनावलं देखील आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी घ्या, असं ते म्हणाले आहेत. (Jammu and Kashmir over the death of three civilians Defence Minister Rajnath Singh not make any mistake army)

भारतीय लष्कराने देशाचं रक्षण केवळ शत्रूंपासून करायचं नाहीये, तर त्यांच्यावर देशाच्या जनतेचे हृदय जिंकण्याची जबाबदारी देखील आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. तसेच अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घ्यावी, असं त्यांनी सुनावलं आहे. जम्मू-काश्मीरमधून आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल, असंही ते म्हणाले.

Rajnath Singh
जम्मू-काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; मशिदीमध्ये अजान प्रार्थनेवेळी हल्ला

लष्कराच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यानंतर जवळपास आठ स्थानिक नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील तीन जणांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह परिसरात आढळून आले होते. तसेच इतर पाच जणांचा अतोनात छळ करण्यात आला होता. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. लष्कराच्या छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

Rajnath Singh
Jammu Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला

लष्कराने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. यात एका ब्रिगेडियरची बदली करण्यात आलीये, तसेच तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीये. तसेच याप्रकरणाचा तपास देखील सुरु केला आहे. राजनाथ सिंह हे बुधवारी जम्मूमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रदेशाची सुरक्षा स्थितीची पाहणी केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते, तर दोन जखमी झालेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()