अमित शाह ॲक्शन मोडमध्ये; 'टार्गेट किलिंग'बाबत अजित डोवालांसोबत 2 महत्वपूर्ण बैठका

Amit Shah Ajit Doval
Amit Shah Ajit Doval esakal
Updated on
Summary

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केलीय.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी (Terrorist) सातत्यानं लक्ष्य करत आहेत. गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूंना ठार मारण्यात आलंय. यावर्षी खोऱ्यात आतापर्यंत 18 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. दरम्यान, खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचं (Kashmiri Pandit) पलायन पुन्हा एकदा सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सलग दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यावरून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. दहशतवाद्यांना सामोरं जाण्यासाठी ठोस योजनेची रूपरेषाही सरकारनं तयार केलीय.

Amit Shah Ajit Doval
काश्मिरात आणखी एका हिंदूची हत्या; दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या

..म्हणून पाकिस्तानी दहशतवादी संतापले

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केलीय. याशिवाय 2019 मध्ये कलम 370 अंतर्गत राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाल्यामुळं पाकिस्तानी दहशतवादी संतापले आहेत. या रागात ते टार्गेट किलिंग करत आहेत. तीन दिवसांत एक काश्मिरी आणि दोन बिगर-काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आलीय. मंगळवारी कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी रजनी बाला नावाच्या सरकारी शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी कुलगामच्या अरेह गावात दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापक विजय कुमार (२७) यांची गोळ्या झाडून हत्या केली. तो राजस्थानचा रहिवासी होता. कुमार यांच्या हत्येनंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी बडगाममध्ये गैर-काश्मीरी मजुरांवर देखील हल्ला केलाय. या हल्ल्यात दिलखुश कुमार यांचा मृत्यू झालाय. तो बिहारचा रहिवासी होता.

Amit Shah Ajit Doval
काश्मीरमध्ये पंडितांचं हत्यासत्र सुरुच; १९९० नंतर खोऱ्यात मोठं स्थलांतर

'टार्गेट किलिंग'च्या विरोधात योजना तयार करा

विजय कुमार यांच्या हत्येनंतर गृहमंत्री अमित शहांनी गुरुवारी दिल्लीत NSA अजित डोवाल (Ajit Doval) आणि RAW प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत शाह यांची बैठक प्रस्तावित होती. परंतु, त्याच्या एक दिवस आधी त्यांनी दहशतवादविरोधी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी NSA सोबत बैठक घेतली. टार्गेट किलिंगमध्ये गुंतलेले बहुतेक दहशतवादी असे आहेत, ज्यांचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीय. त्यामुळं हे 'दहशतवादी' सुरक्षा दलांसाठी मोठं आव्हान बनले आहेत. याला सामोरं जाण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस (Jammu and Kashmir Police) दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करतील, अशी रणनीती आखण्यात आलीय. तर दुसरीकडं ज्या दहशतवाद्यांची ओळख पटलीय ते पाकिस्तानी आहेत, असंही कळतंय. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या 150-170 दहशतवादी सक्रिय आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()