Vidhansabha Election: राजकारणात महत्त्वाचे फेरबदल, तीन माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

Latest Marathi News: राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा विधानसभेत जाणवणार अनुपस्थिती
Vidhansabha Election: राजकारणात महत्त्वाचे फेरबदल, तीन माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
Updated on

जावेद मात्झी ः सकाळ न्यूज नेटवर्क

Shrinagar Latest News: जम्मू-काश्‍मीरच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री रिंगणाबाहेर राहणार आहेत. डॉ.फारुख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद आणि मेहबूबा मुफ्ती या तीनही जी मुख्यमंत्र्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेस यांच्यात आघाडी स्थापन होण्यात मोलाची भूमिका बजावणारे काश्‍मीरचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले डॉ. फारुख अब्दुल्ला हे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार नाही. त्यांच्याप्रमाणे गुलाम नबी आझाद हेही काश्‍मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनीही यंदा माघार घेतली आहे. आझाद यांच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला.

Vidhansabha Election: राजकारणात महत्त्वाचे फेरबदल, तीन माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
Vidhansabha Election: छत्रपती संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'चा पहिला उमेदवार ठरला! राज्यातील सर्वच पक्षाची डोके दुखी वाढणार?

जम्मू-काश्‍मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती याही विधानसभेत दिसणार नाही. बीजबेहरामधून १९९६ मध्ये पहिली निवडणूक लढवून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मुफ्ती यांनी २०१६ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा राज्यातील राजकारणात महत्त्वाच्या नेत्या बनल्या. यंदा बीजबेहारा मतदारसंघातून त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती निवडणूक लढवीत आहे.

निवडणूक न लढविण्याच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या निर्णयामुळे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या त्यांच्या पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा कारण देत निवडून आल्यास पक्षाचे धोरण योग्य पद्धतीने राबविण्याबाबत मुफ्ती यांनी शंका व्यक्त केली आहे.

Vidhansabha Election: राजकारणात महत्त्वाचे फेरबदल, तीन माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
Vidhansabha Election: काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? निवडणुकीआधी प्रदेश प्रभारींनी केली मोठी घोषणा, आघाडी धर्म पाळणार

मुफ्ती यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात केलेल्या प्रयत्नांकडे त्यांनी लक्ष वेधले होते. बारा हजारजणांविरुद्ध दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेणे, फुटीरतावाद्यांशी संवाद साधण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. सध्याच्या स्थितीत या निर्णयांची पुनरावृत्ती करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘पीडीपी’ नेत्याकडून समर्थन

‘पीडीपी’च्या एका वरिष्ठ नेत्याने मुफ्ती यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ‘‘ मुफ्ती यांच्या निवडणूक न लढविण्याचा निर्णयातून या भागातील जनतेशी असलेल्या बांधिलकी दिसते. मताधिकारापासून वंचित ठेवलेल्या विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जागी केले होते. ,’’ असे ते म्हणाले.

Vidhansabha Election: राजकारणात महत्त्वाचे फेरबदल, तीन माजी मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
Vidhansabha Election Prediction: विधानसभेला महायुतीचा पराभव झाल्यास मोदी सरकारही पडणार; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.