'आम्हाला पैसे नकोयेत ...'वीरमातेचा देशाच्या राजकारण्यांकडून अपमान?फोटोसाठी केली बळजबरी

एवढं सगळं फक्त एका फोटोसाठी ? वीरमातेला देशाच्या राजकारण्यांकडून अपमान, फोटोसाठी केली बळजबरी
'आम्हाला पैसे नकोयेत ...'वीरमातेचा देशाच्या राजकारण्यांकडून अपमान?फोटोसाठी केली बळजबरी
Updated on

Martyred Captain Shubham Gupta's Mother Video: काश्मिर खोऱ्यात मागील काही दिवसांपासून अशांतता पसरली आहे. दहशतवादी आणि भारतीय संरक्षण दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरु आहे. खोऱ्यातील राजौरी भागात भारताच्या जवानांना वीरमरण आले आहे. या चकमकीत २७ वर्षीय कॅप्टन शुभम गुप्ता हे देखील शहीद झाले.

ही बातमी त्यांच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आई रडताना दिसत आहेत आणि उत्तरप्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय व आणखी काही मंत्री त्यांना चेक स्विकारताना फोटो काढण्यासाठी हात धरताना दिसत आहे.

कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर बळजबरी केली जात आहे. वीरमातेचे हात पकडले जात आहेत. या सर्व गोष्टी अशोभनीय आहेत, अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या. या व्हिडीओत अधिकाऱ्यांची आई म्हणत आहे की, "प्रदर्शन भरवू नका."

या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, "आम्ही (योगेंद्र उपाध्याय आणि सहकारी मंत्री) त्यांना फक्त चेक देण्यासाठी गेलो होतो. शहीद जवानांच्या आईला त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाहेर घेऊन आले होते. त्यांना दु:ख अनावर झालेले होते. त्या सतत आपल्या मुलाला परत आणण्याची मागणी करत होत्या. हे सर्व झालय. ही कुजकी मानसिकता आहे, जे अशा गोष्टींवरही राजकारण करत आहेत."(Latest Marathi News)

'आम्हाला पैसे नकोयेत ...'वीरमातेचा देशाच्या राजकारण्यांकडून अपमान?फोटोसाठी केली बळजबरी
Soumya Viswanathan Murder Case: पत्रकार सौम्या हत्याकांडात शिक्षा जाहीर! चार आरोपींना दुहेरी जन्मठेप

कॅप्टन शुभम गुप्ता यांचा गुरुवारी राजौरी या ठिकाणी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले होते. त्यांच्या आईने चेक घेण्यास नकार दिला होता, त्यांना कसलीही अपेक्षा नव्हती. मात्र, मंत्री उपाध्याय यांनी चेक देताना फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यासमोर त्यांची इच्छा नसताना पोज देण्यासाठी उभं केलं. त्यानंतर मंत्र्यांवर टीकेची झोंब उठली. विरोधीपक्ष काँग्रेसने त्यांना 'राजकीय गिधाड' अशी उपमा दिली. (Latest Marathi News)

'आम्हाला पैसे नकोयेत ...'वीरमातेचा देशाच्या राजकारण्यांकडून अपमान?फोटोसाठी केली बळजबरी
PMLA: ईडीची मोठी कारवाई! सुपरटेकविरोधातील मनी लाँड्रिंगचा तपास डीएलएफपर्यंत पोहोचला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.