श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या वरच्या भागात हिमवृष्टी झाल्याने खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बहुतांश भागातील तापमान शून्य अंशाखाली नोंदले गेले. श्रीगर आणि काश्मीरच्या अन्य ठिकाणी सलग दुसऱ्या रात्री किमान तापमान शून्याखाली नोंदले गेले..काश्मीरच्या वरच्या भागात गेल्या आठवड्यापासून अधूनमधून हिमवृष्टी होत असल्याने खोऱ्यात थंडी वाढली आहे. त्याचवेळी राजस्थानात किमान तापमानात घसरण झाली असून दुसरीकडे हिमालयीन राज्य हिमाचल प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारलेली आहे.श्रीनगरमध्ये किमान तापमानात किंचित सुधारणा झाली. कालच्या उणे ०.७ वरून उणे ०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. अर्थात रात्रीचे तापमान अजूनही सामान्यांच्या तुलनेत एक अंशांनी कमीच आहे. काझीगुंद येथे किमान तापमान उणे दोन अंश सेल्सिअस नोंदले गेले तर पहेलगाम येथे किमान तापमान उणे ३.२ अंश सेल्सिअस राहिले..तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या गुलमर्ग येथे शुन्याखाली तापमान नोंदले गेले. कुपवाडा येथे उणे ०.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. कोकेनर्ग येथे ०.७ अंश सेल्सिअस इतके होते. राज्यातील तापमान शनिवारपर्यंत असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. २४ नोव्हेंबरनंतर हवामानात बदल होत असून काश्मीरच्या काही भागात प्रामुख्याने वरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे..राजस्थानात तापमानात घटजयपूर: गेल्या चोवीस तासांत राजस्थानातील बहुतांश भागातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यानुसार अनेक शहरांचे तापमान दहा अंशापेक्षा खाली गेले आहे. राज्यात फतेहपूर येथे ६.७ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच सीकर येथे किमान तापमान सात अंश नोंदले गेले.राज्यात थंड हवेचे ठिकाण असलेल्या माउंट अबू येथे पाच अंश सेल्सिअस नोंदले गेले असून सिरोही येथे ८.१ अंश सेल्सिअस, चुरू येथे ८.६, शांग्रिला आणि भिलवाडा येथे ९.७ आणि करौली येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील वातावरण कोरडे राहिल, असे हवामान खात्याने सांगितले..हिमाचलमध्ये आठ वर्षांत नोव्हेंबर सर्वाधिक शुष्कसिमला: गेल्या दोन महिन्यांपासून हिमाचल प्रदेश दुष्काळाचा सामना करत असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. नोव्हेंबर महिना गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक शुष्क राहिल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कोरड्या हवामानाचा अनुभव २०१६ मध्ये आला होता..तेव्हा वेधशाळेकडे पावसाची नोंद झाली नव्हती. ‘आयएमडी’ हिमाचल प्रदेशचे प्रमुख कुलदिप श्रीवास्तव यांनी, सध्याची स्थिती २०१६ ची आठवण करून देणारी असून त्या काळात नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात खूपच कमी पाऊस किंवा अजिबातच पाऊस झाला नव्हता, असे सांगत आताही तशीच स्थिती आहे, असे नमूद केले.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या तीन ते पाच दिवसांत पावसाची शक्यता नाही. देशातील निवडक उंचीवरच्या ठिकाणावर कमी दाबाच्या पट्ट्याचा असणारा प्रभाव सध्या कमकुवत असल्याने हिमाचल प्रदेशात पाऊस ओसरला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.