Reservation : निवडणुकीपूर्वी काश्मीरमध्ये मोठा बदल; पाकिस्तानी निर्वासितांसह 15 जातींना मिळणार 'आरक्षण'

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर अनेक बदल होत आहेत.
Jammu Kashmir Deputy Governor Manoj Sinha
Jammu Kashmir Deputy Governor Manoj Sinhaesakal
Updated on
Summary

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर अनेक बदल होत आहेत.

जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर अनेक बदल होत आहेत. प्रदेशात नवीन सीमांकन करण्यात आली आहेत. मतदार यादीतही मोठी तफावत आढळून आलीय. आता जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी एक आदेश जारी केला आहे.

Jammu Kashmir Deputy Governor Manoj Sinha
Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र

त्यानुसार 15 नवीन जातींचा आरक्षण (Reservation) यादीत समावेश करण्यात आला आहे. या 15 जातींमध्ये पश्चिम पाकिस्तानातील निर्वासित, जाट आणि गोरखा यांचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण 27 जातींना आरक्षण मिळत होतं. मात्र, आता एकूण 42 जातींना आरक्षण दिलं जाणार आहे.

Jammu Kashmir Deputy Governor Manoj Sinha
Britain : पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

आरक्षण यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन जाती पुढीलप्रमाणे आहेत - वाघे, घिरथ/भाटी/चांग, ​​जाट, सैनी, मरकाबन/पोनिवाला, सोची, हिंदू वाल्मिकी ख्रिश्चन, सोनार, तेली, पिमा (कौरव), बोजरू, गोरकन, पश्चिम पाकिस्तानातील गोरखा, निर्वासित आणि आचार्य इत्यादी जातींचा समावेश आहे.

Jammu Kashmir Deputy Governor Manoj Sinha
NCRB Report : वर्षभरात बलात्काराची 4 हजारहून अधिक प्रकरणं खोटी; पाच वर्षांत 55 टक्क्यांनी वाढ

मागासवर्ग आयोगाच्या सल्ल्यानंतर घेतला निर्णय

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमधील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आयोगाच्या सल्ल्यानुसार, जम्मू-काश्मीरच्या कलम 2 च्या कलम (o) नुसार या जातींचा आरक्षण यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, जम्मू आणि काश्मीर आरक्षण नियमानुसार 2005 मध्ये जिथं -जिथं 'पहाडी बोलणारे लोक' असं लिहिलं आहे, तिथं आता त्यांना ‘Pahari Ethnic People’ म्हणजेच, डोंगरी वंशाचे लोक म्हटलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.