Latest Political News: ‘‘दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना आणि दहशतवाद्यांची कोणत्याही परिस्थितीत सुटका करणार नही. त्याचप्रमाणे सीमेपलीकडून दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे चर्चा होणार नाही,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील सभेदरम्यान केले.
नौशेरा येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र रैना यांच्या प्रचारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीच्या जाहीरनाम्यानुसार त्यांचे सरकार येथे सत्तेत आले तर ते दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना आणि दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडवू इच्छित आहेत.
फारुख अब्दुल्ला एकप्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा पोसण्याबाबत बोलत आहेत. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, मोदी सरकार हे दहशतवाद संपुष्टात आणल्याशिवाय शांत बसणार नाही.एकाही दहशतवाद्याची किंवा दगडफेक करणाऱ्या दंगलखोराची सुटका करण्यात येणार नाही.