Jammu Kashmir Election News: ‘‘१९९० च्या दशकांत काश्मीर खोऱ्यात फारुख घराण्यांच्या आशीवार्दाने दहशतवाद्यांना पायघड्या घातल्या गेल्या. तत्कालीन काळात प्रचंड गोळीबार व्हायचा, कारण स्थानिक नेते पाकिस्तानातील म्होरक्यांना घाबरत असत. पण आता स्थितीत बदल झाला आहे. काश्मीरच्या सीमेवर शांतता आहे. कारण पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरतो आणि गोळीबार करण्यात बिचकतो. जर गोळीबार केला तर मोदी हे गोळीला गोळीनेच उत्तर देतील,’’ असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अमित शहांचा आज सभांचा धडाका होता. मेंढर येथे बोलताना ते म्हणाले, ‘‘यंदाची निवडणूक या राज्यातील तीन घराण्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणणारी आहे. तिन्ही घराण्यांनी काश्मीरमध्ये १९९०पासून दहशतवादाला थारा दिला आणि म्हणून २०१४ पर्यंत राज्यातील सुमारे ४० हजार तरुण मारले गेले. १९९० च्या दशकात दहशतवाद पसरला तेव्हा पर्वतररांगातील गुर्जर, बकरवाल यांनीच त्यांच्या हल्ल्यांचा सामना केला. काश्मीरमध्ये भाजपचे सरकार आल्यास महिलांचे सक्षमीकरण होईल.’’