जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील अरागम भागात सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून इतर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बांदीपोरा येथील अरागम गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर 13 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि बांदीपोरा पोलिसांच्या जवानांनी गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. मोठ्या शोध मोहिमेनंतर चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. त्याचवेळी दुसऱ्या दहशतवाद्याच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद समूळ नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. एवढेच नाही तर मोदी सरकार दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शाह पुढे म्हणाले.
मोदी सरकारच्या शपथविधीच्या दिवशी कांडा भागातील शिव खोडी ते कटरा जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी 25-30 राऊंड गोळीबार केला. यामध्ये चालकाला गोळी लागली. बस दरीत अडकली. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 41 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित दहशतवाद्याचे रेखाचित्र प्रसिद्ध केले. 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
यानंतर दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तान सीमेजवळील हिरानगर येथील सैदा सोहल गावात घरांचे दरवाजे ठोठावले आणि पाणी मागितले. गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी दारे बंद करून आवाज केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये एक जण जखमी झाला. डीआयजी आणि एसएसपी आल्यावर एका दहशतवाद्याने त्यांच्या गाडीवरही गोळीबार केला. ग्रेनेड फेकताना दहशतवादी मारला गेला.
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भदेरवाह-पठाणकोट मार्गावरील ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 5 सैनिक आणि एक विशेष पोलीस अधिकारी (SPO) जखमी झाले. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.