केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी २५० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या मॉलची पायाभरणी केली होती.
श्रीनगरच्या सेम्पोरा भागात यूएई स्थित एमार ग्रुपद्वारे मॉल बांधला जात आहे. याशिवाय ग्रुप जम्मू आणि श्रीनगरमध्ये आयटी टॉवर्स उभारणार आहे.
दरम्यान कलम ३७० हटवल्याचा फायदा झाला की तोटा यांची माहिती समोर आली आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी माहिती दिली आहे. २०२०,२०२१ आणि २०२२ मध्ये बाहेरच्या किती लोकांनी जमीन खरेदी केली, याची माहिती नित्यानंद राय यांनी दिली आहे.
राय म्हणाले, २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १८५ बाहेरील लोकांनी जमीन खरेदी केली आहे.
जम्मू काश्मिरमध्ये गेल्या तीन वर्षात १५५९ भारतीय कंपन्यांनी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक केली. तसेच काश्मिरमध्ये गुन्हेगारी देखील कमी झाल्याचे नित्यानंद यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांवर नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांवर ३२,२६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच वेळी, २०२० मध्ये २९,७६८ आणि २०२१ मध्ये ३१,१७० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.२०१९ च्या तुलनेत यामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते, असे देखील नित्यानंद राय यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.