बिगर काश्मीरींना सुरक्षित स्थळी हालवा; सुरक्षा यंत्रणांचे संकेत

दहशवाद्यांकडून आज दोन बिहारी कामगारांना मारण्यात आलं.
Jammu and Kashmir
Jammu and KashmirTeam eSakal
Updated on

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या हिंसक कारवायांनंतर मोठी अशांतता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी दहशवाद्यांनी हिंदू, शीख किंवा काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना लक्ष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी संध्याकाळी बिहारी कामगारांता गोळीबार करण्यात आला. यावेळी दोघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींना सुरूवात झाली असून, पोलिसांनी काश्मीर बाहेरून आलेल्या कामगार तसेच इतर लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यास सुरूवात केली आहे.

Jammu and Kashmir
दिल्लीतील एम्स संस्थेत विद्यार्थ्यांनी सादर केलेली रामलीला वादाच्या भोवऱ्यात

दहशतवाद्यांच्या कारवायांना प्रत्यूत्तर देण्यासाठी सैन्य आणि पोलिसांकडून मोठी मोहीम राबण्यात येते आहे. या मोहिमेत आता पर्यंत ९ पेक्षा जास्त चकमकींमध्ये ११ पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मात्र ही कारवाई सुरू असताना देखील दहशतवाद्यांच्या हालचाली सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत दहशतवाद्यांनी ११ सामान्य लोकांची हत्या केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jammu and Kashmir
काश्मीर | कुलगाममध्ये अतिरेक्यांचा गोळीबार, दोघांचा मृत्यू

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी आज पोलिसांना विशेष सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील बिगर काश्मीरी लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या लोकांना पोलिस आणि लष्करी छावण्यांसारख्या ठिकाणी स्थलांतरीत केलं जाणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.