काश्मीरमध्ये जैशच्या 4 दहतवाद्यांना अटक

काश्मीरमध्ये जैशच्या 4 दहतवाद्यांना अटक
ANI
Updated on
Summary

जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जम्मूतून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पकडण्यात आलेले दहशतवादी 15 ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलिसांनी जम्मूमध्ये जैशच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांकडून अशीही माहिती मिळाली आहे की, पाकिस्तानमध्ये बसलेला त्यांचा सूत्रधार 15 ऑगस्टला भारतात मोठा घातपात करण्याच्या प्रयत्नात होता. हे हल्ले जम्मू आणि काश्मीरमध्ये करण्याची तयारी करत होते. दहशतवाद्यांनी अशीही माहिती दिली आहे की, ते गाड्यांमध्ये आयईडी बसवणार होते. देशभरात हल्ले करण्याची तयारी सुरु होती.

काश्मीरमध्ये जैशच्या 4 दहतवाद्यांना अटक
पहिल्यांदा लाल किल्ल्यावर कंटेनरची भिंत; पाहा स्वातंत्र्यदिनाची तयारी

पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांची नावेही समोर आली आहेत. यामध्ये तौसिफ अहमद शाह उर्फ शौकत उर्फ अदनान हा शोपियातील आहे. तर इजहार खान उर्फ सोनू खान हा उत्तर प्रदेशातील शामलीचा आहे. याशिवाय पुलवामातील जहांगीर अहमद भट्ट आणि मुतिंजर मंजूर यांचा समावेश आहे.

काश्मीरमध्ये जैशच्या 4 दहतवाद्यांना अटक
भारतात नाकाद्वारे कोरोना लस लवकरच; दुसऱ्या टप्प्यात ट्रायलसाठी मंजुरी

अटक कऱण्यात आलेले दहशतवादी सीमेपलिकडे असलेल्या जैशच्या कमांडर्सच्या संपर्कात होते. मुतजिर उर्फ शाहीद आणि अभार या दोघांनी सर्व दहशतवाद्यांना भारतात दहशतवादी हल्ल्याची जबाबादारी दिली होती. पानीपतचे रिफायनरीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवणे, राम जन्मभूमीची रेकी करणे, ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे गोळा करणे ही कामे त्यांच्याकडे देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.