जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये (Jammu Kashmir Shopian) पुन्हा एकदा गोळीबार झालाय.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये (Jammu Kashmir Shopian) पुन्हा एकदा गोळीबार झालाय. आज (शुक्रवार) सकाळी शोपियानच्या कैपरिन भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आणि सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं. त्यापैकी एक जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे.
ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक (Pakistani Citizen) आहे. या परिसरात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर कारवाई करून दहशतवाद्यांना घेरण्यात आलं. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत आतापर्यंत 2 दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव कामरान भाई उर्फ हनीस असं असून तो जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा (Terrorist Organization) सदस्य आहे. तो कुलगाम-शोपियन भागात सक्रिय होता.
एकाची ओळख पटलेली नाहीये. सध्या इथं शोध मोहीम सुरूच आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील शोपियानच्या कैपरिन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी आज सकाळी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळं शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. याआधी 1 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत लष्करासोबतच जम्मू-काश्मीरचे पोलिसही सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.