J & K SI Recruitment Scam : जम्मू आणि काश्मीर पोलीस भरती घोटाळ्या संदर्भात देशभरात 33 ठिकाणी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी J&K SSB चे अध्यक्ष खालिद जहांगीर आणि कंट्रोलर अशोक कुमार यांच्यासह इतर काही जणांच्या ठिकाणांवर सुरू आहे. जम्मूमध्ये 14, श्रीनगरमध्ये 1, हरियाणात 13 आणि गुजरातमधील गाझियाबाद, बेंगळुरू आणि गांधीधाममध्ये प्रत्येकी एका ठिकाणावर ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आगे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस, डीएसपी आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत.
J&K पोलीस भरती घोटाळा कसा उघड झाला?
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा एड्युमॅक्स कोचिंगचे बहुतेक उमेदवार उपनिरीक्षक भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. जम्मू आणि काश्मीर उपनिरीक्षक भरतीची परीक्षा 27 मार्च 2020 रोजी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 97000 उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर या भरती परीक्षेचा निकाल 4 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये 1200 उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र, परीक्षेत हेराफेरीच्या तक्रारींनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली.
गेल्या महिन्यातही करण्यात आली होती छापेमारी
सीबीआयने गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर सब इन्स्पेक्टर भरती घोटाळ्यात 30 ठिकाणी छापे टाकले होते. 5 ऑगस्ट रोजी जम्मूमधील 28, श्रीनगर आणि बंगळुरूमधील प्रत्येकी एका ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने जम्मू-काश्मीर उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 33 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.