मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : Two Terrorists Killed Were Hiding In Mosque
Jammu Kashmir : Two Terrorists Killed Were Hiding In Mosque
Updated on

श्रीनगर : आज (ता. १९) पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. याशिवाय शोपियांमधील मुनांद येथे देखील गुरुवारी (ता. १८) एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. मुनांदमध्ये अद्यापही शोधमोहीम राबवली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काल (ता. १८) अवंतीपोरा भागात दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या ५० आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांचा याची जाणीव होताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरूवातीस जवानांकडून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरी देखील दहशतवद्यांकडून गोळीबार सुरू राहिल्याने, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. तर अन्य दोघेजण मशिदीत घुसले होते.
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------

आज (ता. १९) सकाळी देखील जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, दहशतवादी ऐकत नसल्याचे दिसताच, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) कमांडो मशिदत घुसले व दोन्ही दशतवद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शोपियामधील मुनांद येथे देखील शोधमोहीम सुरू आहे. या ठिकाणी काल झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांच्या माहितीनुसार या ठिकाणी आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात जवानांनी वेढा दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.