श्रोतेहो, आज सकाळ पॉडकास्टचा हा एक हजारावा भाग आहे. होय. गेले १००० दिवस आम्ही तुमच्याशी पॉडकास्टच्या माध्यमातून जोडले गेलो आहोत. सकाळच्या वेबसाइटमधून, वृत्तपत्रातून तर बातम्या तुम्ही वाचत असताच पण बातम्या ऐकवण्याच्या या प्रवासाला आज १००० दिवस झाले असं म्हणायला हरकत नाही. राजकीय, गुन्हेगारी, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा, सांस्कृतिक, जागतिक अशा विविध सदरांतल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न यापुढेही असाच कायम राहणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यांचं कायमच स्वागत आहे. तेव्हा सकाळ पॉडकास्ट जरूर ऐका आणि तुमच्या प्रियजनांनाही त्याविषयी जरूर कळवा.
आज पॉडकास्टमध्ये काय ऐकणार आहोत, ते पाहूया.
१. "सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा"; शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश
२. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी
३. अखेर कंत्राटी भरतीचा जीआर सरकारकडून रद्द
४. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल ; राहुल गांधींचे आश्वासन!
५. कॅनडाने भारतातील 41 राजदूतांना बोलावलं माघारी
६. 25 मराठी चित्रपटांना राज्य सरकारकडून 8 कोटी रुपयांचं अनुदान
७. न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक खेळणार नाही!
८. कालरात्री देवीचे महत्व
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.