Odisha : ओडिशा सरकारचा शपथविधी १२ जूनला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. मात्र दहा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आहे तर ११ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
swearing-in of new BJP government in Odisha will be held on June 12
swearing-in of new BJP government in Odisha will be held on June 12 Sakal
Updated on

भुवनेश्‍वर : ओडिशामधील भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी आता दहा जून ऐवजी १२ जून रोजी होणार असल्याची माहिती ओडिशामधील पक्षाचे नेते जतिन मोहांती आणि विजयपाल सिंह तोमर यांनी रविवारी दिली. १० आणि ११ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ओडिशातील भाजप सरकारचा शपथविधी हा १२ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे मोहांती यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. मात्र दहा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आहे तर ११ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे ओडिशातील भाजप सरकारचा शपथविधी पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.