मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये उभे असताना एका पोलिसाचा मृत्यू झाला. त्यांच्या छातीत दुखत असल्याने ते बेशुद्ध झाले. त्याला सीपीआर देण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने जिल्ह्यातील पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.