Jawan Playing Cricket: गलवानमध्ये रंगली जवानांची क्रिकेट मॅच; नेटकऱ्यांनी राहुल गांधींना विचारला सवाल!

भारतीय लष्करातील मेजर सुरेंद्र पुनीया यांनी राहुल गांधी यांनी काय म्हटलंय वाचा
Indian Soldier Playing Cricket
Indian Soldier Playing Cricket
Updated on

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर भारतीय जवान मोठ्या उत्साहात क्रिकेट खेळताचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन आता नेटकरी राहुल गांधी आणि रिचा चढ्ढा कुठे आहेत? असा प्रश्न विचारत आहेत. (Jawan Playing Cricket at Galwan Vally in Indo-China Border Netizens asked where are Rahul Gandhi, Richa Chadha)

भारतीय लष्करातील मेजर सुरेंद्र पुनीया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारच-चीन सीमेवर लडाखमधील गलवान व्हॅलीत काही जवान शून्य डिग्री तापमानात निवांतपणे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. दरम्यान, हे फोटो पोस्ट केल्यानंतर मेजर पुनीया यांनीच कॅप्शनमध्ये राहुल गांधींना टोला लगावला आहे. माहिती नाही राहुल गांधी आणि रिचा चढ्ढा सध्या कुठे आहेत?

Indian Soldier Playing Cricket
Excise Policy Case: "पुन्हा पुन्हा तेच, हे तर..."; सीबीआय कशी चौकशी करतंय? सिसोदियांनी कोर्टाला सांगितलं

काय म्हणाले होते राहुल गांधी आणि रिचा चढ्ढा?

राहुल गांधी आणि रिचा चढ्ढा यांनी गलवान व्हॅलीतील भारत-चीन जवानांमध्ये झालेल्या रक्तरंजीत संघर्षानंतर मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त करताना राहुल गांधींनी म्हटलं होतं की, "गलवानमध्ये आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला सडेतोड उत्तर द्यावचं लागेल. मोदीजी, तुमचं तोंड उघडा!" तर लष्करानं पीओके पाकिस्तानच्या तावडीतून घ्यायला तयार आहोत, असं ट्विट केलं होतं. ते रिट्विट करताना गलवानही तुम्हाला आवाज देतेय, असं ट्विट अभिनेत्री रिचा चढ्ढा हीनं केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर मोठा गदारोळ माजला होता, तिला याप्रकरणी माफी देखील मागावी लागली होती.

गलवानमध्ये झाला होता रक्तरंजित संघर्ष

१५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चीन सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीमध्ये २० भारतीय सैनिक शहिद झाले होते. त्यानंतर पॅगाँग लेक परिसरामध्ये झालेल्या हिंसेमुळे ५ मे २०२० रोजी भारतीय आणि चीन सैनिकांमधील तणाव वाढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.