VK Sasikala : अम्मा सरकार परत आणणार... जयललितांची खास मैत्रिण पुन्हा राजकारणात

VK Sasikala Latest News : शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
VK Sasikala Latest News
VK Sasikala Latest News
Updated on

चेन्नई, ता.१७ ः तीन वर्षांहून अधिक काळ राजकीय विजनवासात केलेल्या अण्णाद्रमुकच्या निलंबित सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्वासू व्ही. के. शशिकला यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा प्रवेश करण्याची घोषणा सोमवारी केली. तमिळनाडूत २०२६ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक जिंकून अम्मा सरकार (जयललिता) परत आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील विरोध पक्ष अण्णाद्रमुकचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. यामुळे शशिकला यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. पोएस गार्डन येथील निवासस्थानी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘ माझ्या प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे. चांगला काळ आला आहे आणि हीच योग्य वेळ आहे. मी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे आणि राज्यातील सर्व कानाकोपऱ्यातील लोकांना भेटणार आहे.’’

VK Sasikala Latest News
छ. संभाजीनगर : रिल्स शूट करताना क्लचऐवजी Accelerator वर पाय; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

शशिकला यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे अनेकांना वाटत होते. अशा वेळी त्यांनी पुनरागमनाची घोषणा केली. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकची कामगिरी अत्यंत खालावली होती. पक्ष काही मतदारसंघात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आला तर काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांना अनामत रक्कम गमाविण्याची वेळ आली. याबद्दल चिंता व्यक्त करीत शशिकला म्हणाल्या की, अण्णाद्रमुकच्या बचावासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
‘‘माझा प्रवेश सुरू झाला आहे आणि मी निर्धार कायम आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात मी फिरणार असून राज्याला द्रमुकच्या तावडीतून मुक्त करणार आहे. दौऱ्याचा कार्यक्रम लवकरच कार्यक्रम जाहीर करणार आहे. लोकांचे प्रश्न मांडून त्याची उत्तरे देण्यासाठी द्रमुकला भाग पाडणार आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.

VK Sasikala Latest News
Igor Stimac : भारतीय फुटबॉल फेडरेशननं कोच इगोर स्टिमॅक यांची 'या' कारणामुळं केली उचलबांगडी

‘‘शशिकला यांना पक्षात परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शशिकला आणि अण्णाद्रमुक यांच्यात कोणताही संबंध नाही. पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्या प्रवेशाचा किंवा पुनर्प्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही.’’
- डी.जयकुमार, प्रवक्ते, अण्णाद्रमुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.