JDU च्या एकमेव आमदाराला पक्षात प्रवेश देऊन भाजपनं नितीश कुमारांना झटका दिल्याचं वृत्त आहे.
Arunachal Pradesh Politics News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी आपला जुना मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाला (BJP) राम-राम ठोकत राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत आघाडी करून नवं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजप जेडीयूवर सातत्यानं विश्वासघात केल्याचा आरोप करत आहे.
यातच, आता अरुणाचल प्रदेशातील JDU च्या एकमेव आमदाराला पक्षात प्रवेश देऊन भाजपनं नितीश कुमारांना झटका दिल्याचं वृत्त आहे. नितीश कुमारांनी याच महिन्याच्या सुरूवातीला बिहारमध्ये भाजपला (BJP) धक्का दिला. भाजपची साथ सोडत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांची आरजेडी (RJD) आणि काँग्रेससोबत (Congress) महागठबंधन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमधल्या या सत्तानाट्याला महिना होत नाही तोच भाजपनं नितीश कुमार यांच्या जेडीयूचा बदला घेतलाय.
अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) जेडीयूचे एकमेव आमदार टेची कासो (MLA Techi Kaso) यांनी नुकताच सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे उपाध्यक्ष टेसम पोंगटे यांनी ईटानगरचे आमदार कासो यांचं भाजपतील प्रवेशासंदर्भातील पत्र स्वीकारलं आहे. याच बरोबर आता 60 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 49 वर पोहोचलीय. अरुणाचल प्रदेशमधल्या जेडीयूच्या 7 पैकी 6 आमदारांनी डिसेंबर 2020 मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता जेडीयूचा शेवटचा आमदार टेची कासो हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.