पाटणामध्ये जेडीयू नेत्याची गोळ्या झाडून हत्या

JDU Leader Deepak Kumar Mehta
JDU Leader Deepak Kumar Mehtaesakal
Updated on
Summary

गुन्हेगारांनी दीपक यांच्या डोक्यात एक, पोटात आणि फुफ्फुसात प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या आहेत.

पाटणा : बिहारची (Bihar) राजधानी पाटणामध्ये सोमवारी रात्री उशिरा सत्ताधारी पक्षाचे (JDU) नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक कुमार मेहता यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मेहता हे दानापूरमधून विधानसभा निवडणूक (Danapur Assembly Election) लढवण्याच्या तयारीत होते. यादरम्यान त्यांना धमक्याही येत होत्या. गुन्हेगारांनी मेहता यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी स्थानिक गुन्हेगाराचं नाव घेतलंय. परंतु, याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नाहीय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीपक यांनी काही दिवसांपूर्वी होळी मिलन समारंभाचं आयोजन केलं होतं. यात जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह आणि भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. दीपक यांचे उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांच्याशी जवळचे संबंध होते. दरम्यान, दीपक यांनी दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हा एका गुंडानं त्यांना धमकी दिली होती. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.

JDU Leader Deepak Kumar Mehta
बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा

गुन्हेगारांनी दीपकच्या डोक्यात एक, पोटात आणि फुफ्फुसात प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर जेडीयूच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दीपक मेहता यांच्या मारेकऱ्यांना लवकरात-लवकर अटक करण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट करून म्हंटलंय, पक्षाचे नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक मेहता यांची गुन्हेगारांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मला खूप दुःख झालंय. पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, असं त्यांनी नमूद केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()