पेट्रोलपेक्षा विमानाचं इंधन का आहे स्वस्त? जाणून घ्या Jet Fuel बद्दल

Jet Fuel
Jet Fuelesakal
Updated on
Summary

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक लोक चिंतेत आहेत.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक लोक चिंतेत आहेत. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.84 रुपयाला आहे, तर डिझेल 94.57 रुपयांना विकलं जातंय. शिवाय, मुंबईत पेट्रोलनं 111 रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडलाय. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या स्वतःच्या देशात विमानात भरल्या जाणाऱ्या जेट इंधनाची (Jet Fuel) किंमत खूपच कमीय. दिल्लीत जेट इंधनाची किंमत प्रति लिटर 79,020.16 रुपये आहे. त्यामुळं प्रति लिटर किंमत 79 रुपये झालीय, तर देशात पेट्रोल यापेक्षा 33 टक्के अधिक महाग विकलं जातंय.

जेट इंधन नेमकं काय आहे?

वास्तविक, जेट इंधन आणि पेट्रोल (Gasoline) दोन्ही एकच गोष्टी आहे. तांत्रिक भाषेत पेट्रोलला गॅसोलीन असं म्हणतात. अमेरिका आणि युरोप या देशांत पेट्रोलला गॅसोलीन म्हणून ओळखलं जातं. पण, जेट इंधनावर तुम्ही तुमची कार चालवू शकत नाही. जेट इंधन हे कच्च्या तेलाच्या सर्वात मूलभूत उपउत्पादनांपैकी एक आहे. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे नियंत्रित केलं जातं. जेट इंधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. जेट ए आणि जेट बी. त्यांच्या गुणवत्तेनुसार, हे दोन प्रकारांत विभागले गेले आहेत. जेट बी इंधन प्रामुख्यानं लष्करी कार्यात आणि अत्यंत हवामान परिस्थितीत वापरलं जातं. जेट बी इंधन जेट ए इंधनापेक्षा कमी शुद्ध आहे.

Jet Fuel
पंतप्रधानांनी बुद्धांची मूर्ती ट्विट करताच, भारतीयांनी दिला 'हा' सल्ला

जेट इंधन कसं बनवलं जातं?

कच्चं तेल शुद्ध करताना जेट इंधन आणि पेट्रोल वेगळं केलं जातं. या दोघांमधील मूलभूत फरक त्यांच्यातील हायड्रोकार्बनच्या प्रमाणावर आधारित आहे. पेट्रोल हा हायड्रोकार्बन आहे, ज्यात 7 ते 11 कार्बन अणू असतात, तर जेट इंधन हा हायड्रोकार्बन असतो. ज्यात 12 ते 15 कार्बन अणू असतात. अधिक स्पष्टपणे सांगायचं झालं तर, जेट इंधन मुख्यत्वे रॉकेलपासून बनवलं जातं.

Jet Fuel
उत्तर कोरियानं समुद्रात पुन्हा डागली क्षेपणास्त्रं

पेट्रोलपेक्षा विमानाचं इंधन का स्वस्त?

खरं तर, देशातील पेट्रोलियम उत्पादनांवरील कर वगळता, त्यांना शुद्ध करण्याचा खर्चही ग्राहकांकडून घेतला जातो. कच्चे तेल पेट्रोल, डिझेल, जेट इंधन, रॉकेल आणि एलपीजी सारख्या सर्व उप-उत्पादने बनवण्यासाठी वापरलं जातं. शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेत जेट इंधन बनवण्याचा खर्च कमी होतो. त्यामुळे हे इंधन स्वस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.