रांची : ‘‘झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत(जेएमएम) आघाडी ही घुसखोरांची आघाडी असून हे लोक माफियांचे गुलाम आहेत,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. झारखंडमधील गढवा येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते..‘‘झारखंडमधील आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी एखाद्या उद्योगधंद्याप्रमाणे गैरव्यवहार हा एक उद्योगधंदा बनविला असून, भ्रष्टाचाराने राज्याला एखाद्या वाळवीसारखे पोखरले आहे,’’ अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. राज्यातील ‘जेएमएम’ आघाडी सरकारकडून सुरू असलेल्या लांगुलचालनाच्या राजकारणाने कळस गाठला असून हे सरकार बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे. हे असेच सुरू राहिले तर राज्यातील आदिवासी समुदायाची लोकसंख्या कमी होऊन या समाजाला धोका उत्पन्न होईल, अशी भीतीही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे हे सरकार म्हणजे घुसखोरांची आघाडी असून हे लोक माफियांचे गुलाम आहे, असेही ते म्हणाले..Jharkhand Assembly Election : विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका! चक्क कार्यकारी अध्यक्षांनी केला भाजपमध्ये प्रवेश.झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा झारखंडमधील पहिलाच दौरा आहे. ‘‘भ्रष्टाचाराची वाळवी ही देशाला पोखरून काढते, झारखंडमधील काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आघाडीतील आमदार आणि खासदार हे भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. याचा परिणाम गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना भोगावा लागत आहे.’’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली..मतपेढीच्या राजकारणासाठीराज्यातील ‘जेएमएम’चे सरकार हे बांगलादेशी घुसखोरांचा वापर मतपेढी म्हणून करत आहे. त्यासाठी या घुसखोरांना राज्यात स्थायिक होण्यास मदत करत आहे, ज्यामुळे राज्याच्या सामाजिक रचनेला धोका उत्पन्न झाला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केला. ‘‘राज्यात शाळांमध्ये सरस्वती वंदना म्हणण्यावर बंदी घालण्यात येत आहे, दुर्गा पूजेवेळी राज्यात संचारबंदी लागू होणे तर अगदी सामान्य झाले आहे,’’ असे मोदी म्हणाले..PM Modi in Nashik : नाशिकमध्ये 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची सभा.पंतप्रधान मोदी म्हणाले...-केंद्र सरकारकडून झारखंडला मिळालेल्या हजारो कोटी रुपयाच्या निधीचा जेएमएम सरकारने गैरवापर केला-झारखंडचा विकास होण्यासाठी राज्यात ‘डबल इंजिन’चे सरकार हवे-झारखंडचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील तर राज्यसरकारकडून या प्रयत्नांना खोडा-झारखंडमध्ये सत्ता आल्यास महिलांना दरमहा दोन हजार शंभर आणि बेरोजगार युवकांना दोन हजार रुपये देण्याची भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणा-जेएमएम आघाडीकडून राज्यातील महिलांना आणि युवकांना पोकळ आश्वासने देऊन फसवणूक.मोदींची हमीकेवळ भाजपचे सरकारच झारखंडमधील नागरिकांना सुविधा, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी देईल ही मोदींची हमी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केले..Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमधील जागावाटपावरून ‘इंडिया’ आघाडीत वाद; काँग्रेसकडून २१ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.