रोप वे दुर्घटनेत २ ठार, ४८ पर्यटक अडकले; मदतीसाठी हवाई दल पोहोचले

झारखंडमधील त्रिकूट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्याने ४८ पर्यटक ट्राॅलीत अडकले आहेत.
Jharkhand Rope Way Accident
Jharkhand Rope Way AccidentSakal Digital
Updated on

रांची : झारखंडच्या (Jharkhand) देवघरमध्ये त्रिकुट पर्वताच्या 'रोपवे' मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ टीम काम करित आहे. राज्य सरकारने मागणी केल्यावर भारतीय हवाई दलाचे हेलिकाॅप्टरच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी आणले जाईल. वृत्त लिहीपर्यंत जवळपास सहा लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

एनडीआरएफ टीम बचाव कार्यात

आयटीबीपी, भारतीय लष्कर आणि एनडीआरएफ टीम त्रिकूट पर्वतावर पोहोचले आहेत. हेलिकाॅप्टरच्या मदतीने फसलेल्या सर्व पर्यटकांना सुखरुप ट्राॅलीने खाली उतरवले जाईल. (Jharkhand Accident On Trikut Mountain Tourists Trapped In Ropeway)

Jharkhand Rope Way Accident
Aurangabad| किर्तनकार 'बाबाचा अश्लील व्हिडिओ' व्हायरल, वारकरी संप्रदाय आक्रमक

मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले ...

झारखंडच्या देवघरमध्ये झालेल्या रोपवे दुर्घटनेवर (Ropeway Accident) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, की एनडीआरएफ (NDRF), भारतीय वायसेना आणि गरुड कमांडो आदींची मदत घेतली जात आहे. ज्यांनी रोपवे बनवला होता, ती टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. सर्व हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष आहे. देवघर जिल्ह्यातील मोहनपूर येथील त्रिकूट पर्वतावरील रोपवेमध्ये अचानक बिघाड झाल्याने ४८ पर्यटक ट्राॅलीत अडकले आहेत.

Jharkhand Rope Way Accident
झारखंड आणि छत्तीसगड लस वाया घालवण्यात 'एक नंबर'!

त्यांना सुरक्षितरित्या खाली आणण्यासाठी एनडीआरएफची टीम जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधून बचाव कार्य करित आहे. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. रोपवेत अडकलेल्या पर्यटकांना वारंवार धीर ठेवण्यास सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.