दुसरीकडे देशभरात सरासरी ६.३ टक्के लसींचे नुकसान होत असल्याची बाबही समोर आली आहे. एकीकडे लसींचा तुटवडा जाणवत असताना लसींची एवढ्या मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, ही गोष्ट लाजीरवाणी आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर लसीकरण मोहिम आणखी तीव्र करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. ही बाब लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीमेकडे विशेष लक्ष पुरवले. केंद्रीय आरोग्य सचिवांनीही लसीकरण मोहीमेवर भर देण्याचाच सल्ला दिला आहे. तसेच सध्या होत असलेल्या लसीकरण कामगिरीचं कौतुकही केलं आहे. लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीत लसींच्या नुकसानीबाबतही चर्चा झाली. यावेळी झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये लसींची सर्वाधिक नासाडी होत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. (Jharkhand and Chhattisgarh big vaccine wasters says Central govt)
झारखडमध्ये ३७.३ टक्के तर छत्तीसगडमध्ये ३०.२ टक्के लसींची नासाडी होत आहे. तमिळनाडू या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे १५.५ टक्के लसींचे नुकसान होत आहे. ४५ वर्ष वयावरील सर्वांचं लसीकरण केल्यानं चर्चेत आलेलं जम्मू-काश्मीरही लसी वाया घालवण्यात मागे नाही. १०.८ टक्क्यांसह जम्मू-काश्मीर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे, जिथं १०.७ टक्के लसी या वाया जात आहेत.
दुसरीकडे देशभरात सरासरी ६.३ टक्के लसींचे नुकसान होत असल्याची बाबही समोर आली आहे. एकीकडे लसींचा तुटवडा जाणवत असताना लसींची एवढ्या मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, ही गोष्ट लाजीरवाणी आहे. लसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात चर्चा करण्यासाठी २-३ सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. स्पुतनिक वॅक्सिनला कोविन पोर्टलवरही स्थान देण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नाही. अशा नागरिकांसाठी केंद्र सरकार विशेष मोहीम राबविणार आहे.
राज्यांकडे १.७७ कोटी डोस उपलब्ध
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (ता.२५) दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे सध्या १.७७ कोटींपेक्षा जास्त लसींचा साठा उपलब्ध आहे. तसेच ७ लाख डोस पुढील तीन दिवसांत देण्यात येतील. आतापर्यंत २१.८९ कोटींहून अधिक डोसचे वाटप केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केलं आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्वांना मोफत लसींचे वाटप करण्यात येत आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना स्वत: लसी खरेदी करण्याचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.
देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.