PM Narendra Modi : माटी, रोटी आणि बेटीचे संरक्षण करू; जेएमएम सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे

‘झारखंडमध्ये आदिवासी महिलांना लग्नाच्या नावाखाली झारखंडमधील मुलींची फसवणूक करण्यात येत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

देवघर - ‘झारखंडमध्ये आदिवासी महिलांना लग्नाच्या नावाखाली झारखंडमधील मुलींची फसवणूक करण्यात येत आहे, तसेच येथील जमिनी बळकावण्यात येत आहेत,’ असा आरोप करत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येथील माटी, रोटी आणि बेटीचे संरक्षण करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झारखंडमधील नागरिकांना दिले. संथाल परगण्यात एकापाठोपाठ एक सलग आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले. या मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.