नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची उद्या (ता. १८) सांगता होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी दरम्यान बहुतांश मतदारसंघांत थेट लढा होत आहे. जयराम महातो यांच्या झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचा दहा जागांवर प्रभाव असल्याने याठिकाणी कोणाच्या बाजूने पारडे फिरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.