नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालाबाबत विविध अंदाज वर्तविले जात असताना झारखंडमधील मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपला बहुमत मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ८१ जागा असलेल्या झारखंड विधानसभेत भाजपला सरासरी ४३ ते ५० जागा मिळू शकतात. तर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला २९ ते ३६ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.