Jharkhand Crisis : झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

सरकारच्या बाजूने 48 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही.
CM Hemant Soren government
CM Hemant Soren governmentesakal
Updated on

Jharkhand Crisis : झारखंड विधानसभेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर मतांची विभागणी झाली. सरकारच्या बाजूने 48 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. त्यानंतर हा विश्वासदर्शन प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

आम्हाला धमकावून चालणार नाही

विश्वासदर्क ठरावापूर्वी करण्यात आलेल्या सभागृहातील भाषणात सोरेन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. या राज्यातील जनता जागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला धमकावून चालणार नाही. देशाचे पंतप्रधानच जर देशातील राज्यांसोबर भांडत असतील तर, देशाचा विकास कसा होणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

CM Hemant Soren government
Supreme Court : धार्मिक नावांचा वापरावरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपचे नाव न घेता निशाणा साधला. भाजपला असे वातावरण तयार करायचे आहे की, जिथे दोन राज्ये एकमेकांच्या विरोधात असतील. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी गृहयुद्धाचे वातावरण निर्माण करायचे आहे आणि दंगली भडकवायचा असल्याचा आरोपही सोरेन यांनी केला. मात्र, जोपर्यंत येथे यूपीएचे सरकार आहे तोपर्यंत भाजपच्या मानातील हे कारस्थान यशस्वी होणार नसून, तुम्हाला योग्य राजकीय उत्तर मिळेल असेदेखील सोरोन यांनी म्हटले आहे.

CM Hemant Soren government
Teacher's Day : पंजाबमध्ये शिक्षकांना मिळाला 'मान' CM कडून '7th पे' ची घोषणा

विधानसभेतील पक्षाची स्थिती

81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेएमएमकडे 30 आमदार आहेत. काँग्रेसचे 18 आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपचे 26 आमदार असून, बहुमताचा आकडा 41 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.