Police Recruitment: खाकी वर्दीचे स्वप्न भंगले! पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी दरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू

Police Recruitment Jharkhand: उत्पादन शुल्क विभागातील हवालदारांच्या भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा दावा झारखंड भाजपने केला आहे.
Police Recruitment
Police RecruitmentEsakal
Updated on

उत्पादन शुल्क विभागातील हवालदारांच्या भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा दावा झारखंड भाजपने केला आहे. यामागे अधिकाऱ्यांचा गैरकारभार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी तसेच पीडितांच्या कुटुंबियांना नोकऱ्या देण्याची मागणी भाजपने केली आहे.

शनिवारी झालेल्या शारीरिक चाचणीदरम्यान काही उमेदवारांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, किती उमेदवारांचा मृत्यू झाला याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, झारखंड उत्पादन शुल्क विभागातील हवालदारांच्या स्पर्धा परीक्षा अंतर्गत शारीरिक चाचण्या रांची, गिरिडीह, हजारीबाग, पलामू, पूर्व सिंहभूम आणि साहेबगंज जिल्ह्यातील सात केंद्रांवर सुरू होत्या.

सर्व केंद्रांवर वैद्यकीय पथके, औषधे, रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. दुर्दैवाने, शारीरिक चाचणी दरम्यान काही केंद्रांवर काही उमेदवारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

Police Recruitment
LPG Price Hike: ग्राहकांना नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच दणका, सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; काय आहेत नवे दर?

झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी शारीरिक चाचणीदरम्यान 10 उमेदवारांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासोबतच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना भरपाई आणि नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे.

मरांडी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'उमेदवारांना मध्यरात्रीपासून रांगेत उभे करत दुसऱ्या दिवशी कडक उन्हात धावायला लावले जाते. भरती केंद्रांवर आरोग्य सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था केलेली नाही. मृत तरुणांच्या नातेवाईकांना सरकारने तातडीने भरपाई आणि नोकऱ्या द्याव्यात. तसेच या गंभीर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.

Police Recruitment
Haryana : हरियानात आता ५ ऑक्टोबरला मतदान ; बिश्नोई समाजाच्या मागणीमुळे आयोगाने वेळापत्रक बदलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.