देवघर अपघात : बचावकार्य 46 तासांनंतर पूर्ण; तिघांचा मृत्यू

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
De
De
Updated on

देवघर : झारखंडमधील देवघर येथील त्रिकूटजवळ (Deoghar Cabal Car Accident) झालेल्या रोपवेच्या (Rope-way) अपघातात ट्रॉलीमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासनाने परस्पर सहभागाने हे संपूर्ण बचावकार्य पार पाडले आहे. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना जवळपास 46 तास अथक प्रयत्न करावे लागले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी झालेल्या या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेबद्दल आणि अपघातातील मृत्यूबद्दल ट्वीट करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. (Jharkhand Cable Car Accident Rescue Operation Completed)

De
प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

देवघरचे उपायुक्त (डीसी) मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे रोपवेच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवेच्या अनेक ट्रॉली एकमेकांवर आदळल्या, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रोप-वेच्या केबिनमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले होते. अखेर 46 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या सर्व प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना देवघर सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.