माझ्याकडचे अंतर्वस्त्र संपलेत, ते आणायला दिल्लीला गेलो होतो; असं का म्हणाले बसंत सोरेन?

'माझ्याकडील अंडरगारमेंट्स संपवले आहेत, ते विकत घ्यायला दिल्लीला गेलो होतो.'
Jharkhand CM Hemant Soren Basant Soren
Jharkhand CM Hemant Soren Basant Sorenesakal
Updated on
Summary

'माझ्याकडील अंडरगारमेंट्स संपवले आहेत, ते विकत घ्यायला दिल्लीला गेलो होतो.'

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचे भाऊ बसंत सोरेन (Basant Soren) यांनी "नवी दिल्लीतून अंडरगारमेंट्स" खरेदी केल्याच्या विधानावरुन वाद निर्माण झालाय.

झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, हेमंत सोरेन यांचे भाऊ आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन म्हणाले, मी दुमकामधून दिल्लीला अंडरगारमेंट्स (Undergarments) खरेदी करण्यासाठी जात असतो, असं त्यांनी म्हटलंय. बसंत सोरेन बुधवारी दुमका इथं दोन अल्पवयीन मुलींची हत्या झाल्याचं पाहून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीला का गेला होता? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्याकडील अंडरगारमेंट्स संपवले आहेत, ते विकत घ्यायला दिल्लीला गेलो होतो, असं त्यांनी उत्तर दिलंय.

Jharkhand CM Hemant Soren Basant Soren
Amit Shah : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; संशयित व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

'मी तिथूनच अंडरगारमेंट्स आणत असतो'

बसंत सोरेन यांना पत्रकारानं विचारलं की, दुमका इथं दोन मुलींची हत्या झाली आणि तुम्ही इथं दिसला नाही? या प्रश्नाच्या उत्तरात सोरेन म्हणाले, "माझ्याकडील अंडरगारमेंट्स संपले होते, म्हणून मी ते विकत घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. मी ते तिथूनच अंडरगारमेंट्स आणत असतो." गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बसंत सोरेन यांच्या 'अंडरगारमेंट्स' या वक्तव्यावर टिप्पणी केलीय.

Jharkhand CM Hemant Soren Basant Soren
Shiv Sena : 'धनुष्यबाण' चिन्ह नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी - शंभूराज देसाई

पीडितांच्या कुटुंबांबद्दल ही असंवेदनशीलता आहे : दुबे

दुबे म्हणाले, पीडितांच्या कुटुंबांबद्दल ही असंवेदनशीलता आहे. गरीब आणि आदिवासींचे नेते, म्हणजेच गुरुजींचे पुत्र बसंत सोरेन आता अंडरगारमेंट्स खरेदी करण्यासाठी दुमकाहून दिल्लीला जातात का? असा सवाल त्यांनी केलाय. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही दुमका इथं अल्पवयीन मुलीला फाशी दिल्याच्या घटनेवर म्हटलं होतं की, अशा घटना सतत घडत असतात. अशा घटनांचा अंदाज लावता येत नाही.” या विधानामुळं सोरेन यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

Jharkhand CM Hemant Soren Basant Soren
Satara : मिशीला पीळ मारून काही होत नसतं; उदयनराजेंनी उडवली शिवेंद्रराजेंची खिल्ली

बसंत सोरेन दिल्लीला का गेले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बसंत सोरेन 29 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात हजर होणार होते. कोळसा खाण प्रकरणात हेमंत सोरेन यांना गोवण्यात आलंय, त्याच प्रकरणात बसंत सोरेन यांची चौकशी होणार होती. 29 ऑगस्ट रोजी ते सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी गेल्याचं वृत्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()