रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाशी युती करायची याचे संकेतही दिले आहेत. सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.