Champai Soren: दिल्लीला गेलेल्या चंपाई सोरेन यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात, एका जवानाचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

Champai Soren convoy vehicle accident: चंपाई सोरेन हे रात्री दिल्लीवरून रांची येथे आले होते. यावेळी सुरक्षा जवानांनी त्यांना त्यांच्या जिलिंग्गोडा निवासस्थानी सोडले.
Champai Soren
Champai Soren
Updated on

रांची- झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हेमंत सोरेन सरकारमधील कॅबिनेट मंत्री चंपाई सोरेन यांच्या एक्सॉर्ट वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जवानाचा मृत्यू झालाय तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाली आहे. एक्सॉर्ट वाहनाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विनय बानसिंग नावाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन हे रात्री दिल्लीवरून रांची येथे आले होते. यावेळी सुरक्षा जवानांनी त्यांना त्यांच्या जिलिंग्गोडा निवासस्थानी सोडले. त्यानंतर जवानांचा ताफा परत येत होता. यावेळी वाहनाला एका अज्ञात वाहनाची जोराची धडक बसली. अपघात भीषण होता. गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. एकाचा जागीच मृत्यू झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.